पुणे शहर अवैध धंदे मुक्त..
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस
( गृह मंत्री महाराष्ट्र राज्य )
विषय :- पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये चालू असलेले अवैध मटका, जुगार, पत्ते क्लब, गांजा, ड्रग्स, नाईट लाईफ पब कायमस्वरूपी बंद करणेबाबत.
महोदय,
संपूर्ण पुणे शहरामध्ये एकूण 30 पोलीस ठाणे आहे, वरील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेमलेला एक वसुली करणारा पोलीस कर्मचारी यांच्या आशिर्वादामुळे हे सर्व अवैध धंदे चालतात. सर्व पोलीस ठानेच्या हद्दीमध्ये गजबजलेल्या वस्तीत मटका, दारू, जुगाराचा अड्डा सुरू आहे. या अवैध धंद्यात वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांचा हात आहे.
पोलिस ठाण्याच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांनी सर्व पोलीस ठानेच्या वसुली करणाऱ्या कर्मचारी यांच्या संपर्कात राहून धंदे सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे. पोलीस ठाणेमधील वसुली करणारे पोलीस कर्मचारी हे अवैध धंदे व्यावसायिकांचा आर्थिक फायदा वाढवून, या बेकायदेशीर प्रयत्नांना मदत करत असल्याचे दिसते. पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगारी ही फक्त अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिक यांच्याकडून होत असून पुणे शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप स्थानिक पुणेकर करत आहेत. तथापि, बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या सर्वांना पकडण्यासाठी MPDA, MOCOCA आणि हद्दपारी यांसारख्या कठोर उपाययोजना तातडीने अंमलात आणणे अत्यावश्यक आहे. शिवाय, आम्ही कृपया सर्व पोलीस ठाणेमधील वसुली कर्मचारी यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप संभाषण तपासण्याची विनंती करतो, ज्या पोलीस कर्मचारी यांचे विरोधात पुरावे सापडतील त्यांच्या विरोधात कलम 311 अंतर्गत योग्य कायदेशीर कारवाई करावी.
Lalit satyawan sasane Contact the author of the petition