तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर येथील पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी हे जनसमर्थन अभियान सुरू करण्यात येत आहे.
उजनी धरणाच्या जवळ असूनही तुळशी गावातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
आमची विनंती आहे की संबंधित प्रशासनाने गावातील पाणीप्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
आमच्या मागण्या:
१.तुळशी गावातील पाणीप्रश्नाची तातडीने पाहणी करावी.
२.गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा.
३.कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची उपाययोजना करावी.
४.करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना द्यावी.
तुळशी गावाच्या पाणीप्रश्नाकडे शासन व संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपले समर्थन नोंदवा आणि ही petition इतरांपर्यंत पोहोचवा. 🙏💧